मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू, महिन्याला 3000 रुपये मिळणार Ladaka Shetkari Yojana September 1, 2024 by akshay1137 लाडका शेतकरी योजना पूर्ण माहिती 👉 येथे क्लिक करून पहा 👈 Ladaka Shetkari Yojana 2024 : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यात या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. या लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. अशातच आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. “लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली. लाडका शेतकरी योजना पूर्ण माहिती 👉 येथे क्लिक करून पहा 👈 “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की, आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आज आपण सोयाबीनला ५ हजार रुपये हेक्टरी आणि कापसालाही ५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत. ही मर्यादा २ हेक्टरपर्यंत असणार आहे”, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. लाडका शेतकरी योजना पूर्ण माहिती 👉 येथे क्लिक करून पहा 👈 “आता आपण ते ई-पीक पाहणी वैगेरे बाजूला ठेवणार आहोत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे. त्या शेतकऱ्यांना आपण ५ हजार रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत. विरोधक म्हणाले की, मग मागच्या वीज बिलाचं काय? आम्ही शेतकऱ्यांचं येणारं वीज बिल घेत नाही तर मग थकलेलं कसं घेणार? मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्याला सोलर, अशा अनेक योजना सरकारने सुरु केल्या आहेत”, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले Ladaka Shetkari Yojana.